कुलवृत्तांत मोठा असल्यामुळे तो दोन भागांमध्ये PDF स्वरूपात तयार केला आहे.
खालील दोन्ही PDF फाइल्स तुमच्या ब्राऊझरमध्ये "View-only" मोडमध्ये उघडतात. "View PDF" क्लिक करा आणि PDF दुसऱ्या टॅबमध्ये दिसेल.
नमस्कार, शांडिल्य जोशी (चित्पावन) प्रतिष्ठानच्या कुलवृत्तान्त समितीने (१९७२) आणि पहिल्या विश्वस्त मंडळाने (१९८२) १५०० पानी कुलवृत्तान्त प्रकाशित केला. त्यानंतर २०२० पर्यंत महाराष्ट्रभर ३९ वार्षिक संमेलने साजरी करण्यात आली, हे आपणास विदित आहेच.
करोनानंतर २०२५ मध्ये सर्व उपक्रम पुन्हा सुरू करताना प्रथम मेळावा (जुलै २०२५) आणि ४० वे भव्य संमेलन (जानेवारी २०२६) साजरे करण्यात आले. त्याचबरोबर प्रतिष्ठानची वेबसाईट अद्ययावत करून ऑगस्ट २०२६ मध्ये कुलवृत्तान्त (१९८२) PDF स्वरूपात सर्वांसाठी उपलब्ध केला आहे.
यामुळे आता १९८२ नंतरच्या दोन पिढ्यांची माहिती कुलबंधूंकडून मिळवून डिजिटल स्वरूपात एकत्रित करण्याचा उपक्रम हाती घेत आहोत. आपल्या घराण्याची किंवा कोकणातील मूळ गावाची, तसेच वडील, चुलते आणि आजोबा यांची माहिती कुलवृत्तान्तामध्ये कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी खाली सोदाहरण माहिती दिली आहे.
वरील आपल्या वंशजांच्या माहितीचा आठव्या दशकानंतर (१९७५-८०) जन्माला आलेल्या आजवरच्या दोन पिढ्यांचा डिजिटल कुलवृत्तान्त करण्याकरिता हा संदर्भ व दुवा ठरणार आहे.
याकरिता लवकरच एक फॉर्म आपल्याला देण्यात येईल. त्यात नवीन पिढीची माहिती दिल्यावर आपल्याला मागील कुलवृत्तान्तांचा संदर्भ मिळवणे यामुळे सोपे जाईल.
विश्वस्त मंडळ
महर्षी शांडिल्य प्रतिष्ठान, पुणे