कुलस्वामी / कुलस्वामिनी

जोशी शांडिल्य कुलाचे देवस्थान

देवस्थान माहिती

कुलस्वामी / कुलस्वामिनी

श्री लक्ष्मीकेशव मंदिर

कोळिसरे, ता. जि. रत्नागिरी

कोळिसरे हे गाव रत्नागिरीपासून सुमारे ५० कि. मी. अंतरावर आहे. रत्नागिरीहून कोळिसरे येथे जाण्यासाठी एस.टी. बसेस आहेत. रत्नागिरी एस.टी. स्टॅण्डवरून कोळिसऱ्याला जाण्यासाठी ऑटोरिक्षाही मिळतात, मात्र जाण्यायेण्याचे रिक्षाभाडे अगोदर ठरवावे लागते.

पुण्या-मुंबईहून स्वतःच्या गाडीने कोळिसऱ्याला जायचे असल्यास रत्नागिरीच्या अलीकडेच २५ कि.मी. अंतरावर 'निवळी फाटा' आहे. तेथून निवळी-जाकादेवी-जयगड या मार्गाने जावे. निवळी फाट्यापासून ११ कि. मी. अंतरावर 'कोळिसरे फाटा' आहे. तेथून सुमारे ५ कि.मी. वर कोळिसरे!

पुजारी: श्री. मराठे
मु. पो. कोळिसरे, ता. जि. रत्नागिरी ४१५६२९
भक्त निवास कोळीसरे — एसी / नॉन एसी रूम्स आणि जेवण-नाश्ता सोय उपलब्ध.
व्यवस्थापक: सौ. करंदीकर कोळीसरे
+91 82753 50077

श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर

कसबा संगमेश्वर, जि. रत्नागिरी

कसबा-संगमेश्वर हे ठिकाण मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण आणि संगमेश्वर दरम्यान असलेल्या शास्त्री नदीवरील पुलापासून आतील बाजूस २-३ कि. मी. अंतरावर आहे. तेथे कुलस्वामी श्रीलक्ष्मीनृसिंहाचे मंदिर आहे. त्या मंदिराशेजारीच श्रीकर्णेश्वराचे प्राचीन हेमाडपंती देवालय आहे.

शास्त्री नदीवरील पुलापासून कसब्यात जाण्यासाठी ऑटोरिक्षा मिळतात. मंदिरापर्यंत कारनेही जाता येते.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक:

देव. विश्वस्त श्री. विनायक विश्वनाथ — ७७०९५२२५५५
श्री. अश्विनीकुमार अरविंद — ९४०५५४१४६३

योगेश्वरी अंबाजोगाई

अंबाजोगाई, जि. बीड, महाराष्ट्र

अंबाजोगाई हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. प्राचीन काळी अंबा नगरी व जयवंती राजाच्या काळात जयवंती नगर म्हणुन ओळखले जाई. अंबेजोगाई हे शहर मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे.

खास करून चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांची देवता आहे. मुकुंद राजांची समाधी आहे. अंबेजोगाईला जाण्यासाठी लातूर/परळी येथपर्यंत 'रेल्वे'नी जाता येते. खासगी आणि सरकारी बसेस उपलब्ध आहेत.

'श्री अंबेजोगाई भक्त निवास न्यास, पुणे' यांनी येथे सर्व सोयींनी युक्त असे भक्तनिवास बांधले आहे.

बूकिंग साठी संपर्क:
७८८८०३६३०८  |  फोन (०२४४६) २४९३०८