🌳 कुलवृत्तांत पहा — लवकरच सुरू करत आहोत  •   •  🌳 कुलवृत्तांत पहा — लवकरच सुरू करत आहोत  •  🌳 कुलवृत्तांत पहा — लवकरच सुरू करत आहोत  •  🌳 कुलवृत्तांत पहा — लवकरच सुरू करत आहोत  • 
शांडिल्य प्रतिष्ठान पुणे

चित्तपावन शांडिल्य गोत्री जोशी परंपरेचा गौरवशाली वारसा

कुलदैवत • शांडिल्य प्रतिष्ठान पुणे माहिती

Maharshi Shandilya
महार्षी शांडिल्य

महर्षी शांडिल्य प्रतिष्ठान पुणे

महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानची स्थापना जरी १६ सप्टेंबर १९८३ रोजी झाली असली तरी त्याचा उगम त्यापूर्वी १० वर्षे कार्यरत असलेल्या 'चित्तपावन शांडिल्य गोत्री जोशी कुलवृत्तांत समिती' यामध्ये आहे. श्री. परशुराम कमलाकर जोशी (सांप्रत वय ९७ वर्षे) यांचा बालपणापासून ध्यास होता की अशा प्रकारचा कुलवृत्तांत असायला पाहिजे. परंतु सुरवातीलाच त्यांच्या लक्षात आले की माहिती संकलनाचे प्रचंड काम एकट्याला झेपण्यासारखे नाही म्हणून स्थानिक कुलबंधूंची एक समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष श्री. गो. न. तथा आबासाहेब जोशी, कार्याध्यक्ष श्री. गो. के. मनोळीकर, कोषाध्यक्ष श्री. ह. के.जोशी आणि कार्यवाह श्री. प. क. जोशी होते. पुढे या समितीत श्री. न. म. जोशी आणि श्री. बापूसाहेब जोशी यांचाही समावेश झाला.

अधिक वाचा

Interactive Family Tree

चित्तपावन शांडिल्य गोत्री जोशींचा जो कुलवृत्तान्त आत्ता तयार आहे. त्याची PDF तयार केली आहे. परंतु त्यात १९८० पर्यंत ज्यांची माहिती मिळाली तेवढीच आहे. त्यानंतर ४५-५० वर्षात पुढील पिढीची माहिती त्यात येणं आवश्यक आहे. यासाठी एक फॉर्म तयार करण्याचे काम चालू आहे. तो फॉर्म या साईट वर लवकरच टाकण्यात येईल. या नंतर तो फॉर्म भरून पाठवला तर हे अपडेट करण्याचे काम करता येईल.
अधिक माहिती साठी-
मिनल जोशी चिंचवड पुणे. - 7767806276
अश्विनी जोशी पुणे. - 9309796877
यांच्याशी संपर्क करावा.

कुलवृत्तांत पहा
Family Tree
Kulswami

🛕 श्री कुलस्वामी देवस्थान

आपल्या समाजाचे आराध्य दैवत, कुलसंस्कृतीचे प्रेरणास्थान आणि श्रद्धेचे केंद्र.

✔ धार्मिक परंपरा
✔ वार्षिक उत्सव
✔ समाज एकता
✔ आध्यात्मिक मार्गदर्शन
अधिक माहिती